मुंबई : काल आणि आज मुंबईतील लोकांनी सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअॅपवर 'मुंबईत काही आयसिसचे दहशजतवादी घुसले असून ते लोकल ट्रेनमध्ये काही घातपाती कृत्ये करण्याच्या तयारीत आहेत' अशा आशयाचा मॅसेज अनेकांना आला.
मुंबई लोकलमधून लाखो मुंबईकर दररोज प्रवास करतात. त्यामुळे अनेकांची पाचावर धारण बसली. प्रत्येकाने आपल्या मित्रांना, आप्तेष्टांना हा मॅसेज फॉरवर्ड केला आणि ही अफवा वणव्याच्या वेगाने पसरली.
शेवटी मुंबई पोलिसांनी एका ट्विटद्वारे लोकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडण्याचं आवाहन केलं. मुंबई लोकल प्रवासासाठी अत्यंत सुरक्षित असून प्रवास करण्यास कोणताही धोका नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
Rumour Alert- Please do not believe in rumours about a threat to the local trains.
— Mumbai Police (@MumbaiPolice) January 21, 2016
पण, आज मुंब्र्यातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केल्यानंतर पुन्हा एकदा या अफवांचं मुंबईत पेव फुटलंय. अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांना बळी न पडता असे मॅसेज कोणालाही फॉरवर्ड न करण्याचा सल्ला पोलिसांनी दिलाय.