राजेश लाटकर यांचा पराभव, राष्ट्रवादीला धक्का

कोल्हापुरात राजेश लाटकर यांच्या निमित्तानं राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसलाय. भाजपच्या आशिष ढवळे यांनी लाटकर यांना धूळ चारलीय. 

Updated: Nov 2, 2015, 03:19 PM IST
राजेश लाटकर यांचा पराभव, राष्ट्रवादीला धक्का  title=

कोल्हापूर : कोल्हापुरात राजेश लाटकर यांच्या निमित्तानं राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसलाय. भाजपच्या आशिष ढवळे यांनी लाटकर यांना धूळ चारलीय. 

प्रभाग क्रमांक 16 शिवाजी पार्क इथून राजेश लाटकर राष्ट्रवादीकडून उभे होते. तर काँग्रेसकडून सुजितसिंह देसाई आणि शिवसेनेकडून विश्वजीत मोहिते यांना उमेदवारी मिळाली होती.

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदी विराजमान असलेल्या राजेश लाटकर यांच्यावर कोल्हापूर जनता सहकारी बँकेत घोटाळ्याप्रकरणी अनेक आरोप होत होते. उल्लेकनीय म्हणजे, ऑक्टोबर 2010 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राजेश लाटकर हे मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित असणाऱ्या प्रभाग क्रमांक 12, विचारेमाळ मधून निवडून आले होते. परंतु त्यांनी दाखल केलेलं प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं जानेवारी 2012 मध्ये त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं होतं 

कोल्हापूर निकाल : सतेज पाटील यांनी काँग्रेसचा गड राखला

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ३० ते ६० चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ६१ ते ९० चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ९१ ते १२२ चा निकाल

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.