भाजपला कात्रीत पकडण्यात शिवसेना यशस्वी होणार?

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीत शिवसेनेनं भाजपला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केलं आहेत.

Updated: Oct 21, 2015, 10:26 PM IST
भाजपला कात्रीत पकडण्यात शिवसेना यशस्वी होणार?   title=

प्रताप नाईक, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीत शिवसेनेनं भाजपला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केलं आहेत.

भाजप-ताराराणी आघाडीनं अनेक गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या लोकांना उमेदवारी दिल्यामुळं त्याचं खरं स्वरुप समाजासमोर आलं आहे, असा प्रचार शिवसेनेचे नेते उघडपणे करत आहेत. त्यामुळं भाजपा चांगलीच कात्रीत सापडली आहे. शिवसेनाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचा मुद्दा मिळाल्यामुळं भाजपा चांगलीच घायाळ झाली आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणूक निमित्तानं राजकीय ज्वर चांगलाच चढू लागलाय. शिवसेना आणि भाजप यंदा स्वतंत्रपणे लढतायत. त्यामुळे एकमेकांना कोंडीत पकडण्याचा दोन्ही पक्ष प्रयत्न करतायत... मिळेल त्या मुद्याचं भांडवल केलं जातंय... आता तर शिवसेना ताराराणी आघाडीच्या आडून भाजपवर निशाणा साधतेय... भाजप-ताराराणी आघाडीनं अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी दिल्यामुळं या पक्षांचं खरं स्वरुप समाजासमोर आलं असल्याचा प्रचार शिवसेनेचे नेते उघडपणे करतायत. पण, ताराराणी आघाडीनं हे आरोप द्वेषापोटी होत असल्याचं म्हटलंय. 

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. सर्वच पक्षांचा प्रचार उत्तरोत्तर रंगत जाणार आहे. आरोप-प्रत्यारोप फैरी झडतील... पण, कोल्हापूरकर नेमकं कुणाला स्वीकारणार हे येत्या दोन नोव्हेंबरला स्पष्ट होईल. 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.