भरदुपारी गळा विवाहितेची हत्या, ठाण्यातील धक्कादायक घटना

ठाण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. भर दुपारी ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात पासपोर्ट कार्यालयामागील रस्त्यावर महिलेची हत्या करण्यात आलीय. फुटपाथवर गळा चिरून महिलेची हत्या करण्यात आली.

Updated: May 6, 2015, 08:43 PM IST
भरदुपारी गळा विवाहितेची हत्या, ठाण्यातील धक्कादायक घटना title=

ठाणे: ठाण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. भर दुपारी ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात पासपोर्ट कार्यालयामागील रस्त्यावर महिलेची हत्या करण्यात आलीय. फुटपाथवर गळा चिरून महिलेची हत्या करण्यात आली.

ठाण्यातील किसन नगरमध्ये राहणारी नवविवाहित महिला प्रियंका प्रमोद खराडे (24) आपल्या माहेरी आली होती. तिचं माहेरचं नाव प्रियंका जगताप... सध्या कल्याणला राहत असलेली प्रियंका पती प्रमोदसोबत ठाण्यात परीक्षेसाठी आली होती. ज्ञानसाधना महाविद्यालयात तिची परीक्षा होती. 

नुकताच तिचा विवाह झाला होता. आठ दिवसांपूर्वी लग्न झालेली प्रियंका परीक्षेसाठी आली आणि तिचा मृतदेह पासपोर्ट कार्यालयाच्या मागील फुटपाथवर तिच्या कुटुंबियांना सापडला. तिच्या हत्येचं कारण अजून कळलं नसलं तरी प्रेमप्रकरणाच्या वादातून ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 

दरम्यान, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आहेत. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.