'फडणवीसांच्या मनात पुण्याबद्दल आकस'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात पुण्याबाबत आकस आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. ते पुण्यात बोलत होते. 

Updated: Aug 17, 2015, 12:37 PM IST
'फडणवीसांच्या मनात पुण्याबद्दल आकस' title=

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात पुण्याबाबत आकस आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. ते पुण्यात बोलत होते. 

पुणे 'मेट्रो'बाबत देवेंद्र फडणवीस यांनी दुजाभाव केला, असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला. स्मार्ट सिटीमध्ये पुणे आणि पिंपरी - चिंचवड यांचा एकत्रित समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं या शहरांवर अन्याय होणार आहे, अशी जनभावना आहे. 

यावरच प्रतिक्रिया देताना 'फडणवीस यांनी जाणीवपूर्वक स्मार्ट सिटी योजनेत पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांचा एकत्रित समावेश केला आहे, असा आरोप चव्हाण यांनी केलाय. हा निर्णय बदलला नाही तर, त्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.