राज ठाकरेंनी फोडला महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या  संकल्पनेतील वन औषधी उद्यानाच्या  लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मनसेने आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

Updated: Dec 28, 2016, 08:22 AM IST
राज ठाकरेंनी फोडला महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ  title=

 नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या  संकल्पनेतील वन औषधी उद्यानाच्या  लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मनसेने आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर,यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले तर  भारत जाधव, केदार शिंदे, पुष्कर  क्शोत्री या कलाकारांनी कार्यक्रमाला हजेरी लवली.  पर्यावरणावर आधारित लेझर शो असणारे आणि  वन विभागाच्या जागेत महापालिकेन खाजगी कंपनीच्या माध्यमातून विकसित केलेलं  देशातील एकमेव वन  उद्यान असलायचा  दावा राज ठाकरे यांनी केला. 

आगामी काळात इतरही प्रकल्प पूर्णत्वास येणार असल्याच आश्वासनही त्यांनी दिल.  तर राज जे काही करतो ते पराकोटीचे करतो अशा शब्दात  नाना पाटेकर यांनी राज ठाकरे यांची पाठ थोपटली.  इतर शहरातून निवडणून ये म्हणजे दुसर्या शहरांचा विकास बघता येईल, आज लोक ज्यांना आजमावताहेत  ते सर्व होऊन जाऊदे शेवटी लोक तुज्या कडे येतील अशा शुभेच्छा देत इतर पक्षांना टोला लगावला.

 तर अभिनेते भरत जाधव यांनीहि बोटानिकल गार्डन सह विविध प्रकल्प इतर कुठल्याच शहरात बघयला मिळत नसल्यानं नाशिकमध्ये  घर घेण्याची इच्छा व्यक्त केली.  कार्यक्रमाच्या सुरवातीला पर्यावरणावर आधारित लेझर शो दाखविण्यात आला.