नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील शिवसेनेचे तालुका प्रमुख शंकर पाटील ठाणेकर यांची हत्या झालीय.
ठाणेकर हे आपल्या सहकाऱ्यांसोबत मुंबईहून परत येत असताना नगर-बीड रस्त्यावर जामखेडनजिक भोसकून त्यांची हत्या करण्यात करण्यात आलीय. जामकर गाडीतून जात असताना त्यांची गाडी अडवून ही हत्या करण्यात आली.
ही हत्या लुटमारीच्या उद्देशाने झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी लुटमारीचा बनाव करून ही हत्या झाल्याचा संशयही व्यक्त होतोय.
ठाणेकर यांनी मुखेड आणि परिसरातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणली होती आणि ते या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी त्याचा पाठपुरावाही करीत होते.
त्याचबरोबर, मुखेड विधासभा मतदारसंघातून विधासभा निवडणूक लढण्यासही ते इच्छुक होते. त्यांच्या हत्येच्या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.