www.24taas.com, मुंबई
शिवाजी पार्कवर प्रचाराच्या सभेसाठी मनसेला परवानगी मिळणार का, याचा फैसला आज हायकोर्टात होणार आहे. शिवाजी पार्कवर १२ आणि १३ फेब्रुवारीला सभा घेण्यासाठी मनसेनं महापालिकेकडे परवानगी मागितली होती. मात्र शिवाजी पार्क परिसर ‘सायलेन्स झोन’ म्हणून घोषित करण्यात आल्यानं महापालिकेनं परवानगी नाकारली आहे.
त्यानंतर मनसेनं हायकोर्टात धाव घेतली. आता आज याप्रकरणी हायकोर्ट निर्णय देणार आहे. विशेष म्हणजे १३ फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची सभा घेण्यासाठी मनसे प्रयत्नशील आहे. कारण याच दिवशी MMRDA मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची तोफही धडाडणार आहे.
त्यामुळे कोर्टानं राज ठाकरेंना परवानगी दिल्यास मुंबईत एकाच दिवशी काका आणि पुतण्याची जुगलबंदी पहायला मिळेल. आता हायकोर्ट मनसेला परवानगी देतं का ? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.