मुंबई: वांद्रे कोर्टात एका व्यक्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. स्वतःचाच गळा कापून त्यानं आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याची घटना कोर्टरूममध्ये घडली. त्यानं आपल्या हाताच्या नसा देखील कापून घेतल्या. जखमी अवस्थेत त्याला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
दोन तरुण एका खटल्यासंदर्भात आज वांद्रे कोर्टात आले होते. परंतु कोर्टात सुनावणी सुरु असताना त्यातील एकानं गळा कापण्याचा प्रयत्न केला. तिथं असलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी त्याला थांबवलं आणि रुग्णालयात दाखल केलं आहे.
रुग्णालयात उपचार झाल्यानंतर या तरुणाला निर्मल नगर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आहे. या तरुण कोण आहे आणि त्यानं हे कृत्य का केलं याची चौकशी सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.