मुंबई : लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर केईएमच्या तीन निवासी डॉक्टरांना मारहणा केल्यानंतर डॉक्टरांनी संपाचे हत्यार बाहेर काढले. या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
एका लहान मुलाला केईएम रुग्णालयात मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईंकानी ती निवासी डॉक्टरांना लोखंडी सळी, लाकडी स्टुलाने मारहाण केली. यामध्ये डॉक्टरांना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात रुग्णालय प्रशासनाने तक्रार दाखल केली आहे.
डॉक्टरांनी मुलावर उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. त्यामुळे मुलाचा जीव गेला, असा आरोप नातेवाईंकानी डॉक्टरांवर केलाय. दरम्यान, एका लहान मुलाला केईएम रुग्णालयात आणले तेव्हा तो कोमात गेला होता. त्याच्यावर उपचार करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती केईएमचे डीन डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.
डॉक्टरांना करण्यात आलेली मारहाण हा चुकीचा प्रकार आहे. आम्ही रितसर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यापुढे असे प्रकार होऊ नये म्हणून सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती डॉ. अविनाश सुपे यांनी यावेळी झी मीडियाला दिली.
दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीनंतर केईएमचे डॉक्टर तात्काळ संपावर गेलेत. त्यामुळे याचा परिणाम रुग्णसेवेवर झालाय. संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करताना सुरक्षेत वाढ करावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.