www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या वादग्रस्त विधानाने अचणीत आले होते. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली. त्यानंतर मी जपून विधान करीन असे जाहीर केले. त्यानंतर अजित पवार यांनी तोंड उघडले. त्यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतले. तर दुसऱ्या एका कार्यक्रमात त्यांनी चक्क मीडिया चांगली बातमी दाखविण्याचं आवाहन करताना चक्क हात जोडलेत.
वरळीतील रेसकोर्स मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय उद्यान बनवावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. आज हा धागा पकडत अजित पवारांनी सेनेवर टीका केली. मुंबईतील उद्यानाची काळजी घ्या, मगच दुसऱ्या उद्यानाची मागणी करा. मुंबई पालिकेचे जिजामाता उद्यान आणि प्राणी संग्रहालयाची नीट काळजी घ्या, असे टोला पवारांनी हाणला.
रेसकोर्स मैदानाचा जो काही निर्णय असेल तो मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे घेतील. शिवसेनेला टोला लगावताना रेसकोर्सबाबतच्या निर्णयाचा चेंडू अजित पवारांनी काँग्रेसच्या पर्याने मुख्यमंत्राकडे टोलावलाय. तर गेले काही दिवस उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेला बहुचर्चित ईस्टर्न फ्री-वे म्हणजेच पूर्व मुक्त मार्गाचे दोन टप्पे अखेर गुरुवारी वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाला हात जोडलेत. आम्ही जे काही चांगलं करतो, ते दाखवा, असे सांगून मीडियाला आवाहन केले. यावेळी त्यांनी हात जोडलेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.