मुंबई : भाजपानं स्वबळावर निवडणुका लढवायची तयारी केलीय की काय? अशी शंका येण्याचं कारण म्हणजे भाजपनं सध्या मुंबईत केलेली पोस्टरबाजी. या पोस्टरवर भाजपला मते द्या, एवढाच उल्लेख आहे. राज्यातील युती तसेच महायुतीबाबत काहीही दिसत नाही.
पश्चिम द्रुतगती मार्गावर तसंच महत्वाच्या ठिकाणी भाजपनं पुन्हा एकदा मोदींची प्रतिमा असलेली पोस्टर लावून, आक्रमक प्रचार सुरु केलाय. त्यामुळं भाजप एकला चलो रे ची भूमिका बजावणार का, अशा चर्चेला उधाण आलंय.
लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही मोदींच्या नावावर मते मागताना भाजप दिसतोय. या पोस्टरवर भाजपला मते द्या, एवढाच उल्लेख आहे. शिवसेनेचा किंवा महायुतीतल्या अन्य घटक पक्षांचा उल्लेख पोस्टरवर नाही, हे विशेष.
शिवसेना-भाजपचा 25 वर्षांचा युतीचा संसार टिकणार की तुटणार, हा संभ्रम अजूनही कायमच आहे. कारण एकीकडं दोन दोन पावलं पुढं यायचं आवाहन केलं जातंय. पण जागावाटपाचं अडलेलं गाडं तसूभरही पुढे सरकताना दिसत नाहीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.