www.24taas.com,मुंबई
मध्य रेल्वेने कर्जत-कसारा मार्गावर गुरूवार २८ मार्चपासून नव्या २२ लोकल फेऱ्या सुरू कणार आहे. त्यामुळे गर्दीतून प्रवाशांची काही प्रमाणात सुटका होणार आहे.
ठाण्याणे ते कर्जत-कसारा मार्गावर १२ तर कल्याण ते कर्जत-आसनगाव , सीएसटी आणि दादर-कल्याणसाठी १० अशा एकूण २२ लोकलच्या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
२२ लोकलच्या फेऱ्यांमुळे मध्य रेल्वेची प्रवासीक्षमता ७७ हजारांनी वाढेल. मेनलाइनवर रोजच्या फेऱ्या ८०३वरून ८२५ होईल. एकूण फेऱ्यांची संख्या १२७९ वरून १३०१ होईल.
कल्याणपर्यंतच्या १२ डब्यांच्या फास्ट गाड्या १५ एप्रिलपर्यंत १५ डब्यांमध्ये परावर्तित करण्यात येणार आहेत. त्यामुळे १५ डब्यांच्या फेऱ्यांची संख्या १६ वरून २६ होईल. या नव्या फेऱ्यांमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.
नवीन लोकलचे वेळापत्रक
ठाणे स्टेशन :
>ठाणे स.५.४४- आसनगाव स.६.५६ ( दिवा , कोपर , ठाकुर्लीला थांबा नाही).
>ठाणे स. ९.०४- कर्जत स.१०.२० ( कळवा , मुंब्रा , दिवा , कोपर , ठाकुर्लीला थांबा नाही).
>ठाणे दु.१२.११- आसनगाव दु.१.०१ (सर्व स्टेशनांवर थांबेल.)
>ठाणे दु.१२.११- कर्जत दु.१.३७ (सर्व स्टेशनांवर थांबेल)
ठाणे दु.२.१६- कसारा दु.३.४८ (कळवा , मुंब्रा , दिवा , कोपर , ठाकुर्लीला थांबा नाही)
>ठाणे सायं.६.५९- बदलापूर सायं.७.४१ ( कळवा , मुंब्रा , दिवा , कोपर , ठाकुर्लीला थांबा नाही)
कर्जत , कसारा , आसनगाव , बदलापूर
( सर्व स्टेशनवर थांबतील)
>कर्जत स.१०.४१- ठाणे दु.१२.०७
>आसनगाव दु.१.१६- ठाणे दु. २.२५
>कर्जत दु.१.३२- ठाणे दु.३.०२
>कसारा सायं.५.१२- ठाणे सायं.६.५२
>बदलापूर रा. ७.५९- ठाणे रा. ९.०४
>कर्जत दु. १२.५८- ठाणे दु.१४.१२ (डोंबिवली-ठाणे फास्ट , दिवा , कोपर , ठाकुर्ली , मुंब्रा , कळव्याला थांबा नाही.)
कल्याण-आसनगाव
( सर्व स्टेशनांवर थांबा)
>कल्याण स.७.५८- आसनगाव स. ८.३७
>कल्याण स.११.१७- कर्जत दु.१२.१२
>आसनगाव स. ७.१०- कल्याण रा. ७.४८
>आसनगाव स. ८.४५- कल्याण स.९.२३
सीएसटी-कल्याण
१२ डब्यांच्या गाड्या -
>सीएसटी स.११.४५- भायखळा स. ११.५२ - दादर स.११.५८ - कुर्ला दु.१२.०६- घाटकोपर दु. १२.११- भांडुप दु. १२.१९- ठाणे दु. १२.२६- डोंबिवली दु. १२.३९- कल्याण दु.१२.४८
>सीएसटी दु. २.१०- भायखळा दु. २.१७- दादर दु. २.२४- कुर्ला दु.२.३२- घाटकोपर दु. २.३७- भांडुप दु. २.४६- ठाणे दु. २.५५- डोंबिवली दु. ३.०७- कल्याण- दु. ३.१५
दादर-कल्याण
दादर दु. ४.०९- कुर्ला दु. ४.१७- घाटकोपर सायं. ४.२२- भांडुप-मुलुंड-थांबा नाही- ठाणे दु. ४.३८- डोंबिवली सायं. ४.५०- कल्याण दु. ५.
कल्याण-सीएसटी
कल्याण दु.१२.५५- डोंबिवली दु. १.०२- ठाणे दु.१.१५- मुलुंड-१.१९- भांडुप-थांबा नाही- घाटकोपर दु. १.३१- कुर्ला दु. १.३५- दादर दु. १.४३- भायखळा दु. १.४९- सीएसटी १.५८.
कल्याण-दादर
कल्याण दु.३.२०- डोंबिवली दु.३.२७- ठाणे दु.३.४०- मुलुंड/भांडुप-थांबा नाही- घाटकोपर दु.३.५४- कुर्ला दु.३.५८- दादर- दु.४.०६.
कल्याण सायं.५.१४- डोंबिवली सायं.५.२१- ठाणे सायं.५.३४- मुलुंड/भांडुप-थांबा नाही- घाटकोपर-सायं. ५.४८- कुर्ला सायं.५.५२- दादर सायं.६.
१५ डब्यांमध्ये परावर्तित
सीएसटी-कल्याण फेऱ्यांसह कल्याणसाठीच्या १२ डब्यांच्या लोकल १५ एप्रिलपासून १५ डब्यांमध्ये परावर्तित करण्यात येतील. त्यात या फेऱ्यांचाही समावेश केला जाणार आहे.
>सीएसटी स.७.३२- कल्याण स.८.३२
>कल्याण स.८.४२- सीएसटी स.९.४४
>सीएसटी स.९.५२- ठाणे स.१०.३४
>ठाणे स.१०.४२- सीएसटी स.११.३०