तपासणीच्या नावाखाली मुलुंडमध्ये डॉक्टरचा मुलीवर बलात्कार

पोटदुखीची तक्रार घेऊन एकटीनंच डॉक्टरकडे जाणं मुलुंडमधील 17 वर्षीय मुलीला चांगलंच महाग पडलं. डॉक्टरनं मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिचे नग्न फोटो काढले. ते सोशल मीडियावर जाहीर करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. डॉ. जयेश खतिरा (48) असे या नराधम डॉक्टरचं नाव असून, मुलुंड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Updated: Sep 7, 2014, 09:18 AM IST
तपासणीच्या नावाखाली मुलुंडमध्ये डॉक्टरचा मुलीवर बलात्कार title=

मुंबई: पोटदुखीची तक्रार घेऊन एकटीनंच डॉक्टरकडे जाणं मुलुंडमधील 17 वर्षीय मुलीला चांगलंच महाग पडलं. डॉक्टरनं मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिचे नग्न फोटो काढले. ते सोशल मीडियावर जाहीर करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. डॉ. जयेश खतिरा (48) असे या नराधम डॉक्टरचं नाव असून, मुलुंड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मुलुंड कॉलनीत डॉ. खतिरा याचा ‘आकांक्षा नर्सिंग होम’ नावाचा दुमजली दवाखाना आहे. तो बीएचएमएस असून गेल्या 25 वर्षांपासून या ठिकाणी प्रॅक्टिस करतो. 1 सप्टेंबरला पोटदुखीची तक्रार घेऊन एक अल्पवयीन मुलगी त्याच्याकडे आली. ती एकटीच आहे ही संधी साधत तपासणी करण्याच्या बहाण्यानं खतिरानं तिला कपडे काढण्यास सांगितलं. नंतर तपासणीच्या बहाण्यानं त्यानं तिचे मोबाइलमध्ये फोटो काढले. लगेच त्यानं हे फोटो तिला दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. भेटायला ये, नाहीतर फोटो व्हॉट्सअॅप, फेसबुकवर अपलोड करेन, अशी धमकी देऊ लागला. 

भेदरलेल्या मुलीनं हा प्रकार मैत्रिणीला सांगितला. मात्र शुक्रवारी दुपारी 12 वाजता पुन्हा नराधम डॉक्टरनं फोन करून दुपारी साडेतीन वाजता स्वप्ननगरी इथल्या जैन मंदिराजवळ भेटण्यासाठी न आल्यास फोटो फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर टाकण्याची धमकी देत ही अखेरची संधी असल्याचं सांगितलं. यामुळं घाबरलेली मुलगी घरामध्ये काहीही न सांगता रिक्षा पकडून जैन मंदिराजवळ गेली. खतिरा यानं तिला आपल्या कारमध्ये बसवून ठाणे जिल्ह्यातील कापूरबावडी परिसरात असलेल्या टिकुजीनी वाडी परिसराकडील जंगलात नेलं. तिथल्या रस्त्याकडेला कार उभी करून कारच्या मागच्या सीटवरच तिच्यावर बलात्कार केला. तसंच तोंड उघडल्यास फोटो जाहीर करेन, अशी धमकीही दिली. 

घरी परतल्यानंतर मुलीनं घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली. तेव्हा मुलीला सोबत घेवून तिच्या कुटुंबियांनी कापुरबावडी पोलीस ठाणे गाठलं. तिथं खतिराविरोधात तक्रार दिली.   

पार्श्वभूमीबाबत कसून चौकशी

डॉ. खतिरा यानं याआधी असे गुन्हे केले असावेत, असा दाट संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीनं पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करीत आहेत. त्याचा मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यात अन्य मुलींचे फोटो आहेत का, हेही तपासलं जात आहे. शिवाय परिसरातही त्याच्या चारित्र्याविषयी चौकशी होणार असल्याचं समजतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.