मुंबईत खाकी वर्दीतला पोलीसवालाच नशेचा सौदागर

मुंबईमध्ये एक खाकी वर्दीतला पोलीसवालाच नशेचा सौदागर असल्याची धक्कादायक बाब उजेडात आलीय. खाकी वर्दीच्या आडून तो ड्रग्जची विक्री करायचा. धर्मा काळोखे असे या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून, मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तो कामाला होता.

Updated: Mar 10, 2015, 11:55 PM IST
मुंबईत खाकी वर्दीतला पोलीसवालाच नशेचा सौदागर title=

मुंबई : मुंबईमध्ये एक खाकी वर्दीतला पोलीसवालाच नशेचा सौदागर असल्याची धक्कादायक बाब उजेडात आलीय. खाकी वर्दीच्या आडून तो ड्रग्जची विक्री करायचा. धर्मा काळोखे असे या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून, मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तो कामाला होता.

त्यांच्या ऑफिसमधील ड्रॉवरमध्ये 12 किलो ड्रग्ज सापडलं. हे ड्रग्ज तो गोव्याला विकण्याच्या तयारीत होता. एवढंच नव्हे तर त्याच्या साता-याच्या घरातून पोलिसांनी तब्बल 112 किलो ड्रग्ज जप्त केलंय. या गोरखधंद्यामध्ये एक महिला ट्रॅव्हल एजंटही सामील असल्याची माहिती मिळतेय. गिरगावमध्ये अलिकडेच घातलेल्या एका छाप्यामध्ये हे ड्रग्ज मिळाल्याची माहिती धर्मानं पोलीस चौकशीत दिली. हे ड्रग्ज विकून लाखो रूपये कमवण्याचा त्याचा प्लान होता.

मुंबईमध्ये एक खाकी वर्दीतला पोलीसवालाच नशेचा सौदागर असल्याची धक्कादायक बाब उजेडात आलीय. मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातल्या त्याच्या ड्रॉवरमध्ये तसंच साता-याच्या घरामध्ये कोट्यवधी रूपयांचं अंमली पदार्थ सापडलेत. मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल धर्मा काळोखेनं खाकी वर्दीला काळा डाग लावला. पोलिसाच्या वेषात तो ड्रग्ज विक्री करत असल्याची गुप्त खबर मिळाल्यानंतर, पोलिसांनी त्याच्या साता-याच्या घरी छापा घातला. खंडाळा तालुक्यातील कन्हेरी गावात घालण्यात आलेल्या या छाप्यात तब्बल 22 कोटी रूपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

धर्मा काळोखेच्या ऑफिसमधील ड्रॉवरमध्येही 12 किलो ड्रग्ज सापडलं. हे ड्रग्ज तो गोव्याला विकण्याच्या तयारीत होता. जप्त केलेल्या साठ्यामध्ये म्याव म्याव या नावानं प्रचंड मागणी असलेल्या एमडी ड्रग्जचाही समावेश होता. गिरगावमध्ये अलिकडेच घातलेल्या एका छाप्यामध्ये हे ड्रग्ज मिळाल्याची माहिती धर्मानं पोलीस चौकशीत दिली. हे ड्रग्ज विकून करोडो रूपये कमवण्याचा त्याचा प्लान होता. त्यासाठी त्यानं वरळीला राहणा-या पाटणकर नावाच्या एका महिला ट्रॅव्हल एजंटची मदत घेतली. गोव्यामध्ये हे ड्रग्ज विकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या महिलेचा शोध आता पोलीस घेत आहेत.
 
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी ड्रग्जच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू केलीय. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये मुंबईच्या DRIच्या पथकानं टाकलेल्या छाप्यात तब्बल 340 किलो मेफेड्रोम ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. त्याशिवाय उर्से टोल नाक्यावर स्विफ्ट कारमधून 3 कोटी किमतीचं तब्बल 50 किलो मेफेड्रोन ड्रग्जही ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र एकीकडं पोलीस चांगली कामगिरी बजावत असताना, खाकी वर्दीतलेच काही गद्दार या गोरखधंद्यात सहभागी होऊ लागलेत, ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.