हेमा उपाध्याय हत्या प्रकरण : पती चिंतनला अटक

कलाकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हेमंत बंबांनीच्या हत्येप्रकरणी हेमा उपाध्याय यांचे पती चिंतन उपाध्याय याला अटक करण्यात आलीय. 

Updated: Dec 22, 2015, 11:22 AM IST
हेमा उपाध्याय हत्या प्रकरण : पती चिंतनला अटक  title=

कांदिवली, मुंबई : कलाकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हेमंत बंबांनीच्या हत्येप्रकरणी हेमा उपाध्याय यांचे पती चिंतन उपाध्याय याला अटक करण्यात आलीय. 

काल रात्री कांदिवली पोलिसांनी चिंतनला ताब्यात घेतलं. हेमाचा पती चिंतन उपाध्यायशिवाय दुसऱ्या कुणाकडेही हेमाला मारण्याचं कारण नव्हतं, असा आरोप हेमाच्या चुलत भावाने याआधी केला होता. त्यामुळे, पोलिसांचीही चिंतनवर चांगलीच नजर होती. 

अधिक वाचा - हेमा उपाध्याय हत्या प्रकरणाला वेगळे वळण

अधिक वाचा - कलाकार हेमा उपाध्याय खूनाची कॅमेऱ्यासमोर कबुली

अधिक वाचा - अभिनेत्री आणि वकिलाचा मृतदेह पोत्यात सापडला

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील यांचे मृतदेह दोन पोत्यात भरून एका नाल्यात फेकण्यात आले होते. याप्रकरणी आधीच चौघे जण अटकेत आहेत.