मालेगाव स्फोट : सरकारी वकील सालियन यांचा गंभीर आरोप

मालेगाव स्फोटांच्या खटल्यातल्या सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी गंभीर आरोप केलेत. केंद्रात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणातल्या आरोपींविरोधात आपल्याला नरम होण्यास सांगितलं गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, आम्ही कुणावरही दबाव टाकलेला नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

Updated: Jun 25, 2015, 08:30 PM IST
मालेगाव स्फोट : सरकारी वकील सालियन यांचा गंभीर आरोप  title=

मुंबई : मालेगाव स्फोटांच्या खटल्यातल्या सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी गंभीर आरोप केलेत. केंद्रात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणातल्या आरोपींविरोधात आपल्याला नरम होण्यास सांगितलं गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, आम्ही कुणावरही दबाव टाकलेला नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सालियन यांनी हा गौप्यस्फोट केलाय. या खटल्यात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहितसह १२ जण आरोपी आहेत. केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आल्यानंतर आपल्याला राष्ट्रीय तपास संस्था, अर्थात NIAचा एक अधिकारी भेटायला आला. त्यानं या प्रकरणात नरमाईचं धोरण स्वीकारण्याचे आदेश वरून देण्यात आल्याचं आपल्याला सांगितलं. 

NIA या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेनंतर १२ जूनला याच अधिकाऱ्यानं आपल्याला खटल्याच्या सुनावणीस जाऊ नका, दुसरे वकील जातील असं सांगितल्याचा आरोप सालियन यांनी केला आहे. असं असेल तर NIAनं आपल्याला अधिकृतरित्या डीनोटिफाय करावं, म्हणजे आपण अन्य केसेस घेऊ शकू, अशी मागणी रोहिणी सालियन यांनी केली आहे. 

पाहा व्हिडिओ

सप्टेंबर २००८ रोजी मालेगावला मशिदीबाहेर झालेल्या स्फोटात चौघांचा बळी गेला होता, तर ७९ जण जखमी झाले होते. दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी आम्ही कुणावरही दबाव टाकलेला नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. सालियन यांच्या गौप्यस्फोटानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.