मराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाची मंजुरी

 मराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाने तात्काळ मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यात आता मराठा 16 टक्के तर मुस्लिम 5 टक्के आरक्षण लागू होणार आहे.

Updated: Jun 25, 2014, 08:33 PM IST
मराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाची मंजुरी title=

मुंबई : मराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाने तात्काळ मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यात आता मराठा 16 टक्के तर मुस्लिम 5 टक्के आरक्षण लागू होणार आहे.

काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण समिती नेमण्यात आली होती. राणे समितीने शिफारस केल्यानंतर नव्या आरक्षणाला मुंजरी देण्यात आली आहे. सध्याचे जे आरक्षण आहे. त्याला धक्का न लावता नव्याने आरक्षण लागू करण्यात आले आहे.

या नव्या आरक्षणानुसार मराठा आणि मुस्लिमांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळणार आहे. मुस्लिम आरक्षणासाठी विशेष मागास मुस्लिम प्रवर्गाची निर्मिती करण्यात आली आहे. नव्या आरक्षणामुळे राज्यात आता 73 टक्के आरक्षण झाले आहे. आरक्षमाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला १६ टक्के, तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्तावावर आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात उद्योगमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच मराठा आरक्षणाची घोषणा करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  

राणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने मराठा समाजाला २० टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. परंतु आजच्या बैठकीत १६ टक्के आरक्षणावर मंत्रीमंडळाने मंजुरीची मोहर उमटवली. 
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या विद्यमान आरक्षण टक्केवारीला धक्का लावला जाणार नाही, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. मराठा समाजाची लोकसंख्या, नोक-या आणि शिक्षणामधील या समाजाचे मागासलेपण, आर्थिक परिस्थिती आदी निकषांचा उपयोग करून आपल्या समितीने २० टक्के आरक्षणाची शिफारस केल्याचे राणे यांनी सांगितले होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.