दादरमधून 85 लाखांच्या नव्या नोटा जप्त

नोटाबंदी जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणी जुन्या तसेच नव्या नोटा जप्त केल्याच्या अनेक घटना समोर येतायत. 

Updated: Dec 9, 2016, 03:45 PM IST
दादरमधून 85 लाखांच्या नव्या नोटा जप्त

मुंबई : नोटाबंदी जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणी जुन्या तसेच नव्या नोटा जप्त केल्याच्या अनेक घटना समोर येतायत. 

मुंबईतही अशीच घटना घडलीये. मुंबईच्या दादर परिसरातून 85 लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्यात. मुंबई क्राईम ब्रांचने ही कारवाई केलीये. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर अनेक ठिकाणी या नोटांचा साठा आढळला होता. तसेच 2000च्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतरही अनेक ठिकाणी या नव्या नोटांचा साठा जप्त केल्याच्या घटना घडतायत. देशाच्या अनेक भागांतून मोठ्या प्रमाणात नव्या नोटा जप्त केल्या जातायत.