मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या वादाप्रकरणी हायकोर्टानं राऊत यांना फटकारलं आहे. साक्षीदार म्हणून संजय राऊत सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्यामुळे कोर्टानं कडक शब्दात सुनावलं आहे.
यापुढे गैरहजर राहिल्यास कोर्टात आणून उभं केलं जाईल अशा कडक शब्दात कोर्टानं राऊतांना तंबी दिली आहे. ही शेवटची संधी असल्याचं हायकोर्टानं संजय राऊन यांना सांगितलं आहे. संजय राऊत मुंबईत नसल्याची माहिती त्यांच्या वकिलानं कोर्टाला दिली. कोर्टात कधी हजर राहायचं ते 27 ऑक्टोबरला सांगण्यात येईल असंही कोर्टानं नमूद केलं आहे.