मुंबई : लवकरच मुंबईला जलवाहतुकीचा पर्याय मिळणार आहे. जलवाहतुकीचा प्रकल्प येत्या १८ महिन्यात पूर्ण करु असा निर्धार केंद्रिय दळणवळण आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरीं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
यासाठी ट्रान्स हार्बरसाठी विविध देशांतील अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभ्यास करत आहोत असं गडकरींनी स्पष्ट केलं. उरण ते भाऊचा धक्का दरम्यान जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून काल भाऊच्या धक्क्यावर पॅसेंजर स्पीड लाँचंचं उद्घाटन करण्यात आलं.
नितिन गडकरींच्या हस्ते या सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बीपीटी विकासाबाबत त्यांनी अऩेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. त्यामुळे मुंबईतून उरणपर्यंत आता जलवाहतुकीने प्रवास करता येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.