मुंबई पालिका शाळा मिळणार लग्न-समारंभासाठी

मुंबईत लग्नासाठी हॉल मिळणे तशी अशक्यप्राय गोष्ट. मात्र, जर हॉल मिळाला तरी तो सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. आता पालिकेने सर्वसामान्यांना दिलासा दिलाय. पालिकेच्या शाळा लग्न-समारंभासाठी उपलब्ध होणार आहेत.  

Updated: Nov 26, 2015, 03:36 PM IST
मुंबई पालिका शाळा मिळणार लग्न-समारंभासाठी   title=

मुंबई : मुंबईत लग्नासाठी हॉल मिळणे तशी अशक्यप्राय गोष्ट. मात्र, जर हॉल मिळाला तरी तो सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. आता पालिकेने सर्वसामान्यांना दिलासा दिलाय. पालिकेच्या शाळा लग्न-समारंभासाठी उपलब्ध होणार आहेत.  

तुळशीचे लग्न लागले की विवाह मुहूर्त काढण्याची प्रथा आहे. त्यामुळे लग्नसराईच्या तोंडावरच मुंबई पालिका प्रशासनाने नागरिकांसाठी खूशखबर दिली आहे. सुटीच्या काळात लग्न, साखरपुडा, मुंज अशा कार्यक्रमांसाठी पालिका शाळांमधील सभागृह देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा घेतला आहे. 

पालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना कार्यक्रमासाठी स्वस्तात सभागृह उपलब्ध होऊ शकणार आहे. दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीबरोबरच सार्वजनिक सुट्टी आणि रविवार या दिवशीही सभागृह भाड्याने देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलाय.

लग्न, साखरपुडा, मुंज अशा कार्यक्रमांसाठी पालिका शाळांतील सभागृह भाड्याने दिले जात होते, मात्र काही कारणांमुळे प्रशासनाने त्याला स्थगिती दिली होती. नागरिकांच्या मागणीचा विचार करुन शाळा सभागृह भाड्याने देण्याचा निर्णय घेतलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.