...नाहीतर खूनाचे बोट सरकारकडे जाते – राज ठाकरे

अख्या देशाला विचार देणारा हा महाराष्ट्र. अशा महाराष्ट्रात आणि तेही पुण्यासारख्या शहरात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होतो. हे दुर्दैव आहे. दाभोलकर यांच्या हत्येमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची भरून न निघणारी हानी झाली आहे. या खूनाचा तपास झालाच पाहिजे. ..नाहीत खूनाचे बोट सरकारकडे जाते, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 20, 2013, 05:07 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
अख्या देशाला विचार देणारा हा महाराष्ट्र. अशा महाराष्ट्रात आणि तेही पुण्यासारख्या शहरात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होतो. हे दुर्दैव आहे. दाभोलकर यांच्या हत्येमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची भरून न निघणारी हानी झाली आहे. या खूनाचा तपास झालाच पाहिजे. ..नाहीत खूनाचे बोट सरकारकडे जाते, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
प्रबोधनकारांचे विचार पुढे नेणा-या डॉ. दाभोलकरांच्या हत्येनं महाराष्ट्राच्या पुरागामी चळवळीची भरून न निघणारी हानी झाली आहे. मला संशयाची सुई नको. कुठल्याही परिस्थितीत हल्लेखोर पकडले जायला हवेत. अन्यथा संशयाची सुई सरकारकडेच जाते, असं राज म्हणालेत.
जादूटोणा विधेयकाला विरोध करणाऱ्यांचे कटकारस्थान आहे की काय? ज्यांची दुकानं या गोष्टीवर चालतात, त्यांचंच हे कृत्य आहे. असा संशय निर्माण होण्यास वाव आहे. दाभोलकर यांची हत्या ही अतिशय दु:खद घटना आहे. जादूटोणा विधेयक मंजूर केले नाही. एकीकडे हे विधेयक मंजूर होणे लांबले आणि दुसरीकडे त्यांची हत्या झाली हे संशयास्पद आहे, असे सांगत या हत्येमागे सरकारचाच हात तर नाही ना? असा संशय राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचा सरकारचा खुलासा करावा. तसेच पोलिसांनी दाभोळकरांच्या मारेकऱ्यांचा शोध लावावा आणि त्यांना अशी कठोर शिक्षा द्यावी. पुन्हा कोणीही असे कृत्य करण्यास धजावणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ