राष्ट्रवादीला डबल हादरा, सावकारे, कथोरेंचा भाजप प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसला आज डबल हादरा बसलाय. राष्ट्रवादीचे भुसावळचे आमदार आणि आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले संजय सावकारे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. तसंच मुरबाडचे राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांनीही आज भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलाय. 

Updated: Sep 22, 2014, 04:49 PM IST
राष्ट्रवादीला डबल हादरा, सावकारे, कथोरेंचा भाजप प्रवेश title=

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसला आज डबल हादरा बसलाय. राष्ट्रवादीचे भुसावळचे आमदार आणि आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले संजय सावकारे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. तसंच मुरबाडचे राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांनीही आज भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलाय. 

भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत सावकारे आणि कथोरे यांनी कमळ हाती घेतलंय. सावकारे हे जळगावचे पालकमंत्रीदेखील आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून कथोरे मनानं राष्ट्रवादीपासून लांब गेले होते. ते भाजपामध्ये येणार असल्याची चर्चा गेल्या होती. आज त्यावर पडदा पडलाय. मात्र आता मुरबाडमधून त्यांना भाजपा तिकिट देणार का, हा प्रश्न आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.