मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदावर दावा सांगितला असला, तरी महापौरपदसाठी शिवसेनेनं केलेला दावा आता भाजप मान्य करण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा - शिवसेनेचे भाजपला प्रत्युत्तर, आम्ही आमचा पर्याय शोधू : उद्धव ठाकरे
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप कल्याण-डोंबिवलीत महापौरदाच्या शर्यतीतून दूर होण्याची शक्यता आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपचं सरकार आहे. त्यात निवडणूकीच्या निमित्तानं दोन्ही पक्षात उभा राहिल्या वादानंतर आता दोन्ही बाजूनं तलवारी म्यान झाल्यात.
अधिक वाचा - निकालानंतर शिवसेना-भाजपच्या तलवारी म्यान, 'सामाना'तून सामोपचाराची भूमिका
पुढची चार वर्षात सरकार सुरूळीत चालवायचं असेल, तर फडणवीसांना शिवसेनेची साथ हवी आहेच. त्यामुळे दानवेंच्या दाव्यानंतरही भाजप एक पाऊल मागे येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.