मुंबईसह पश्चिम उपनगरांत पाऊस

मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे, मुंबईत आज पश्चिम उपनगरांत सकाळी पावसाची सरी आल्या आहेत.

Updated: Jun 14, 2015, 11:38 PM IST
मुंबईसह पश्चिम उपनगरांत पाऊस title=

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे, मुंबईत आज पश्चिम उपनगरांत सकाळी पावसाची सरी आल्या आहेत.

वांद्रेपासून ते वसईपर्यंत आज सकाळी पाऊस झाला आहे. पावसाच्या या रिमझिम तारा मुंबईकरांना उकाळ्यातून सुटका देणाऱ्या आहेत.

आज वसईत महापालिका निवडणुकीचं मतदान सुरू आहे, सकाळपासूनच पावसानेही हजेरी लावल्याने, मतदानावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.