मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्ता मेळाव्यात आज युतीसाठी हात पुढे का केला याची उत्तर दिले... आता माझ्यासाठी हा विषय संपला असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या निवडणूक गीताचे विमोचन केले.
- अमेय खोपकरने गाणे तयार केले, अवधूत गुप्ते यांनी गाण्याला चाल दिली.
- गाण्यावरून लक्षात आले असेल की तयारी किती जबरदस्त आहे.
- पुढील बरेच दिवस बोलायचे आहे.
- ज्या काही बातम्या चालू होत्या त्याचं स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे
- युतीचा प्रस्ताव, टाळी देणार की नाही देणार
- पाणी भरायचा खेळ होता ना
- अनेक लोक बोलताहेत रकानेच्या रकाने लिहीतात
- लाचारी पत्करली, गुडघे टेकले, पाय चाटेल
- मराठी माणसासाठी कोणाचे पायही चाटेल
- पण मुंबई महाराष्ट्रापासून दूर करायचे ठरवले तर पाय ही छाटेल
- केंद्र सरकारमध्ये भाजपचं काय चालू हे तुम्हांला माहिती का
- पहिले विदर्भ मग नंतर मुंबई तोडण्याचा डाव आहे
- भारतीय जनता पक्ष नको म्हणून हात पुढे केला होता.
- आम्ही कपडे काढायला तयार आहोत, कपडे फाडायला तयार आहोत
- कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांनी हेच केले.
- बाळासाहेबांच्या नावाने स्मारकासाठी महापौर बंगला मागितला होता तो जावू नये म्हणून हे सर्व चालू आहे.
- हे सर्व पैशासाठी चालू आहे. राज्यातील आणि केंद्रातील सत्ता भोगायची
- मी सात फोन लावले, एकही फोन उचलला नाही
- तोडणं म्हणजे एका दिवसात होत नाही. ती एक प्रोसेस असते
- बुलेट ट्रेन का आणतात, मुंबई-अहमदाबाद का
- मराठी माणूस अहमदाबादला का जाईल,
- गुजरातमध्ये सहा स्टेशन, महाराष्ट्रात तीन स्टेशन
- गुजरातमध्ये स्टेशन वाढणार
- संयुक्त महाराष्ट्रावे- ळी मुंबई मिळाली नाही त्याची ही खदखद आहे.
- ही मोदी आणि शहा यांचा डाव आहे
- मराठी भागातून मेट्रो जाते आहे, मराठी माणसांना या भागातील घरे परवडणार नाही.
- जास्तीजास्त लोकसंख्या वाढवून आपआपले मतदारसंघ निर्माण करण्याचा डाव
- हे वाळवी सारखं आहे, हातात पुस्तक घेतल्यावर भुसा होता
- राष्ट्रीय पक्षांच्या हातात राज्याची सत्ता देऊ नका
- रेल्वेची परीक्षा द्यायला गेले तेव्हा मराठी तरूण तरूणींना झोडपलं. दुसऱ्या राज्यातील विद्यार्थी असते तर हल्लकल्लोळ झाला असता. हिंदी चॅनल कुठे आहेत..
- सुरेश प्रभुंना पाहिल्यावर तंबाखू द्यावीशी वाटते, कायम चोळत असतात.
- हे बसवलेले मंत्री आहे. त्यामुळे ते काही बोलणार नाही.
- युतीचा हात पुढे केला तेव्हा म्हणतात मराठी मत विभाजन
- मी तुम्हांला इतिहास सांगतो, शिवसेनेचा जन्म १९६६ , मराठी माणसासाठी संघटनेचा जन्म
- १९८८ ला सेनेची सत्ता आहे, त्यावेळी मराठी माणसं काँग्रेसला मतदान करत होते.
- सर्व मराठी माणसांनी इतरांना मतदान केले तर चालतील राज ठाकरेला केले तर मराठी मते फोडतात
- भाजपवाले आता कुठून पैसे काढतात हे मी पाहतो.
- देशात हुकूमशाही सुरू आहे.
- नोटबंदीच्या काळात मोदींची भाषण केली की नवा भारत दिसेल..
- मी रोज खिडकीच्या बाहेर येतो, तोच शिवाजी पार्क... येडा समजला आहे का...
- राज ठाकरेंकडून खूप अपेक्षा होती, पण काय दिलं माझ्या हातात.
- नाशिक दिलं तर गेल्या पाच वर्षात आम्ही केले ते २५ वर्षात कोणत्याही पक्षांनी केलं नाही.
- फेकू टाकलं की मोदींचे फोटो येतात नाव गुगलमध्ये. आमच्या पंतप्रधानांची जगभरात का प्रतिमा आहे ते पाहा...
- शिवसेनेकडे हात पुढे केला हा मुंबईतील मराठी राजासाठी केला... आज माझ्यासाठी हा विषय संपला...
- यापुढे माझं कोण काय वाकड करू शकतो, यावेळी अर्शद वारसीचा एक सीन आठवतो मुन्नाभाई एमबीबीएसचा...
- बोमन इरानी जेलमध्ये भेटायला येतो. अशर्द वारसी संजय दत्तला विचारतो भाई इसको दू क्या...
पहलेसे अंदर हू और कितना अंदर जाऐंगे... मला काय म्हणायचं तुम्हांला समजलं असेल...