खासदार रवींद्र गायकवाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

एअर इंडियानं विमान प्रवासावरची बंदी हटवल्यानंतरही खासदार रविंद्र गायकवाड यांनी सेनाभवनात उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

Updated: Apr 8, 2017, 03:06 PM IST
खासदार रवींद्र गायकवाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट title=

मुंबई : एअर इंडियानं विमान प्रवासावरची बंदी हटवल्यानंतरही खासदार रविंद्र गायकवाड यांनी सेनाभवनात उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

रवींद्र गायकवाड आणि उद्धव ठाकरे यांच्या सुमारे दहा मिनिटं चर्चा झाल्याच सूत्रांनी म्हटलंय. यावेळी गायकवाड यांच्यासोबत अनिल देसाई आणि श्रीरंग बारणे हे देखील उपस्थित होते.

बैठकीत नेमकं काय बोलणं झालं याचा तपशील अद्याप हाती आलेला नाही. एअर इंडियाने रवींद्र गायकवाड यांच्यावर घातलेली प्रवासाची बंदी काल उठवली. गेल्या काही दिवसांपासून हा वाद सुरु होता.