मुंबई: मुंबई सेशन्स कोर्टानं बुधवारी सलमान खानला ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर दबंग सलमान आणि कुटुंबियांसह त्याच्या सर्व फॅन्सची धडधड वाढली. बातमी आली सलमानला कोर्टातून सरळ ऑर्थर रोडजेलमध्ये नेलं जाईल. मात्र तेव्हाच कोर्टाच्या रिअल लाइफ सीनमध्ये वरिष्ठ वकील हरीश साळवे यांची एंट्री झाली आणि अवघ्या काही तासांमध्ये सलमानला जामीन मिळाला.
बुधवारी इंटरनेटवर जेवढी चर्चा सलमानची होती, तेवढीच अॅडव्होकेट हरीश साळवे यांची... ५६ वर्षीय साळवे हे या रील लाइफ हिरोचे 'सुपरहिरो' ठरले. साळवे यांनी हायकोर्टात तथ्य मांडलं की, ऑर्डरची कॉपी मिळाली नाही म्हणून सलमानला जेलमध्ये पाठवणं योग्य ठरणार नाही. वरिष्ठ वकिलांच्या या तर्काला योग्य मानत हायकोर्टानं सलमानला २ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे खास सलमानसाठी दिल्लीतून मुंबईत आले होते. हरीश साळवेंनी जे करून दाखवलं त्यानंतर ते कार्पोरेट, सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांचे आणखीच चहेते झाले असतील.
कोण आहेत हरीश साळवे?
हरीश साळवेंचे आजोबा क्रिमिनल लॉयर, आजी टॅक्स लॉयर... साळवे यांचा जन्म नागपूरचा... त्यांचे आजोबा पी. के. साळवे आपल्या जमान्यातील खूप प्रसिद्ध वकील होते. हरीश साळवे यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मुंबईत सुरूवात केली. टॅक्स लॉयर असलेल्या आपल्या आजीच्या ज्यूनिअर म्हणून त्यांनी काम केलं. मुंबईतून दिल्लीत शिफ्ट झाल्यानंतर हरीश साळवे यांनी ज्येष्ठ वकील सोली सोराबजी यांच्यासोबत काम केलं.
१९९२ साली सुप्रीम कोर्टात हरीश साळवे यांना 'वरिष्ठ वकील' ही पदवी मिळाली आणि १९९९मध्ये सॉलिसिटर जनरल बनवलं. मात्र जेव्हा २००२मध्ये सरकारनं दुसऱ्यांदा त्यांना या पदाची ऑफर दिली तेव्हा त्यांनी ती नाकारली.
हरीश साळवे यांच्या प्रसिद्ध केसेस
२०११ साली साळवे यांनी स्वत:ला अवैध उत्खनन प्रकरणातून दूर केलं. ज्यात ते एकाहून अधिक पक्षांचं ते प्रतिनिधित्व करत होते. २०१२मध्ये वोडाफोनला १,१००० कोटी रुपयांच्या टॅक्स प्रकरणात त्यांनी केस सांभाळली. रिलायंसच्या गॅस वादाच्या प्रकरणात हरीश साळवे मुकेश अंबानींकडून कोर्टात उपस्थित होते.
मध्यरात्री बाबा रामदेव यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या प्रकरणात हरीश साळवे यांनी दिल्ली पोलिसांची बाजू कोर्टात मांडली. मात्र साळवे यांना आपलं वकील बनवणं खूप महागडं आहे.
हरीश साळवे आपल्या एका दिवसासाठी तब्बल ३० लाख रुपयांची फी आकारतात. एवढंच नव्हे तर माहिती मिळालीय की, मुकेश अंबानीनं गॅस वाद प्रकरणात फक्त वकीलांवरच तब्बल १५ कोटी रुपये खर्च केले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.