शिवसेनेत ज्येष्ठ नेत्यांना डावललं जातंय?

शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यापासून शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत असलेले एकेक मोहरे गळत असल्याचं चित्र निर्माण झालंय. आपल्याला डावललं जात असल्याची शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भावना होत असल्याचंच यामुळं स्पष्ट झालंय...

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 23, 2013, 08:19 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यापासून शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत असलेले एकेक मोहरे गळत असल्याचं चित्र निर्माण झालंय. आपल्याला डावललं जात असल्याची शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भावना होत असल्याचंच यामुळं स्पष्ट झालंय...
मध्य मुंबईच्या उमेदवारीवरून लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी नाराज आहेत. सध्या त्यांचा बंडोबा थंड झाल्याचं दिसत असलं तरी त्यांची नाराजी दूर झालीये, असं नाही...
आता शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनीही राज यांची भेट घेतली आणि आपण नाराज असल्याचं संकेत दिले. या भेटीत दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. आपली ही भेट व्यक्तिगत असल्याचं रावलेंनी सांगितलं असलं तरी त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही.
शिवसेनाप्रमुख हयात असताना निवडणुकीपूर्वी आपलं मत विचारलं जायचं, आता मात्र असं होत नसल्याची खंत रावलेंनी व्यक्त केलीये. दक्षिण मुंबईत आपल्याला डावललं जात असल्याचंही ते म्हणाले. त
संच उद्धव आणि राज एकत्र आले तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आनंदच वाटेल, असंही ते म्हणाले...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.