शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्याची संधी साधली आहे. त्यामुळे भाजप-सेनेतील वाद उफाळण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 20, 2015, 03:25 PM IST
शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा title=

मुंबई : शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्याची संधी साधली आहे. त्यामुळे भाजप-सेनेतील वाद उफाळण्याची शक्यता आहे.

यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहखात्यावर तोफ डागलीय.  मुंबईत पोलीस संरक्षणात डान्सबार सुरू असल्याचा घणाघाती आरोप परब यांनी केलाय. 

सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोपही परबांनी केला. ड्यूटीवर असताना दारू पिणाऱ्या पोलीस निरीक्षका विरोधात तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचं त्यांनी नमूद केलं. लोक दिवसाही पोलीस ठाण्यात जायला घाबरतात, अशा शब्दात अनिल परब यांनी गृहखात्याला लक्ष्य केलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.