मुंबईत स्वाईन फ्लूचे आणखी ३ बळी

वरळीतील दीड वर्षीय मुलगा आणि कुर्ल्यातील 72 वर्षीय महिलेचाही स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. 

Updated: May 23, 2017, 10:20 AM IST
मुंबईत स्वाईन फ्लूचे आणखी ३ बळी title=

मुंबई : राज्यात स्वाईन फ्लूनने थैमान घातलं असताना मुंबईत स्वाईन फ्लूचा तिसरा बळी गेला आहे. भांडुपच्या टिळकनगर परिसरात राहणा-या तीस वर्षीय गर्भवतीचा सायन रुग्णालयात मृत्यू झाला आहे. 

मूळची अलाहाबादची असणारी ही महिला महिन्याभरापूर्वीच भांडुप इथं राहण्यास आली होती. ही महिला सात महिन्यांची गर्भवती होती.

याआधी वरळीतील दीड वर्षीय मुलगा आणि कुर्ल्यातील 72 वर्षीय महिलेचाही स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. 

मुंबईत स्वाईन फ्लूचे 37 रुग्ण आढळलेत. तर राज्यात स्वाईन फ्लूची लागण झालेले हजारहून अधिक रुग्ण आढलेत. तर राज्यात स्वाईन फ्लूने दगावलेल्यांची संख्या दोनशे दहा इतकी झाली आहे.