www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकच्या राजीवनगर भागातील नागरिकांनी मध्यरात्री खूनी थरार अनुभवला. अनेक गुन्ह्यातील संशयित भीम पगारे याचा पाठलाग करून सिनेस्टाईल खून झाल्यानं शहरात खळबळ उडालीय.
सुरुवातीला हल्लेखोरांनी गोळीबार केला त्यातूनही तो वाचल्यान शस्त्राने वार करून त्याला ठार केलं. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाहीये. घटनास्थळावरचं रक्ताचं थारोळ, सपासप वार झालेला मृतदेह, जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईकाची शेकडोच्या संख्येन गर्दी, त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त या सर्व घडामोडी नाशिक शहरात सारं काही आलबेल नाही याची साक्ष देतायेत.
अनेक गुन्ह्यात हवा असलेला संशयीत भीम पगारेच्या खुनानंतर ही परिस्थिती उद्धभवलीय. त्याच्या हत्येचा काही थरार तर सीसीटीव्हीमध्येही कैद झालाय. या घटनेला आता 20 तास उलटलेत. मात्र पोलिसांच्या हातात अजुनही काहीच लागलं नाही. तपास सुरु आहे, आणि लवकरच हल्लेखोर ताब्यात येताल या पलिकडे पोलिसांकडे सध्या तरी काहीच उत्तर नाहीय.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसात कायदा सुव्व्य्स्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जिल्हा नायालय आणि रुग्णालयात तर पोलिसांवरच हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेलीय. नाशिकमध्ये पोलीस प्रशासन जागं कधी होणार हा प्रश्न कायम आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.