www.24taas.com,नाशिक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील उपकेंद्राला टाळं ठोकलं. परीक्षा विभागाच्या कारभाला कंटाळून हे ठाळं ठोकण्यात आलंय.
पुणे विद्यापीठातील परीक्षा आणि निकालांमध्ये घोळ होत असल्याने विद्यार्थीना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पालकांमध्येही विद्यापीठाच्या केंद्रातील या गैर काभारामुळे नाराजी होती. विद्यापीठाची स्वतंत्र व्यवस्था असलेले विभागीय इमारत बांधण्याची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. इमारत जैसे थे असल्याने आज नाशिकमध्ये मनसेने पुणे विद्यापीठाच्या नाशिक कार्यालयाला टाळे ठोकले.
तब्बल दोन तास आंदोलक विद्यार्थ्यांनी नाशिक सामन्वाय्काला घेरून कारभार सुरळीत करण्याची मागणी केली. कुलगुरुंनी आश्वासन देऊनही अडीच महिन्यात नाशिकच्या उपकेंद्रात अनेक समस्या आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन केलं आणि अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये कोंडलं. आज फक्त कार्यालयाला टाळं लावलं आहे, यापुढे मनसे स्टाईल आंदोलन करु, असा इशारा भूपेश खैरनार, पांडुरंग बेळे यांनी दिलाय.