बारामतीत भरधाव कारने १६ विद्यार्थ्यांना उडविले

नीरा-बारामती रस्त्यावरून भरधाव वेगाने निघालेल्या मारुती कारने बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथे १६ विद्यार्थ्यांसह एका मजूर महिलेला उडविले. ही घटना आज सायंकाळी घडली. या घटनेत ११ ते १२ विद्यार्थी जखमी झालेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 5, 2013, 12:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, जालना
नीरा-बारामती रस्त्यावरून भरधाव वेगाने निघालेल्या मारुती कारने बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथे १६ विद्यार्थ्यांसह एका मजूर महिलेला उडविले. ही घटना आज सायंकाळी घडली. या घटनेत ११ ते १२ विद्यार्थी जखमी झालेत.
मारुती कार चालक प्रभाकर गुळूमकर यांने नशेत गाडी चालवून अपघात केला. दारू पिवून बेदरकारपणे गाडी चालवून लोकांना जखमी केल्याप्रकरणी त्याच्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील माध्यमिक विद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी आपल्या बाजूने घरी निघाले होते, त्यावेळी मद्यधुंदअवस्थेत असलेला प्रभाकर गुळूमकर हा आपल्या मारुती कारमधून निघालेला असताना हा अपघात झाला.
या अपघातात त्याने तब्बल १६ विद्यार्थी व एका मजूर महिलेस आपल्या कारखाली चिरडले. त्यामध्ये सुमारे ११ ते १२ विद्यार्थि आणि मजूर महिला जखमी झाले आहेत.काही जखमी बारामती येथील खासगी दवाखान्यात तर काहींना लोणंद येथे अधिक उपचारासाठी दाखल केले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.