स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता आणणारच - राज

महाराष्ट्रात स्वबळावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आणणार. ही सत्ता मी आणणार म्हणजे आणणारच, असा ठाम विश्वास अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 9, 2013, 01:43 PM IST

www.24taas.com,मुंबई
महाराष्ट्रात स्वबळावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आणणार. ही सत्ता मी आणणार म्हणजे आणणारच, असा ठाम विश्वास अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
मनसेचा आज सातवा स्थापना दिन आहे. या स्थापना दिनाच्या वर्धापन दिनात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. त्यावेळी हा ठाम विश्वास व्यक्त केला. जे काही चाललं आहे ते तुमच्यामुळे सर्व चाललं आहे. माझ्यात हिंमत येते ती तुमच्यामुळेच. मी पक्ष स्थापन केला त्यावेळी तुम्ही आले नसतात तर...काय झालं असतं..हे उच्चारलं तरी अंगावर काटा येतो, असं राज ठाकरे यावेळी म्हणालेत.

भाषणातील ठळख मुद्दे
मतदार यादीतून परस्पर मराठी नावं वगळली
मुंबईच्या मतदार यादीत गोंधळ असल्याचा आरोप
महायुतीत मनसे सहभागी होण्याची शक्यता लावली फेटाळून
काल पुन्हा टाळी आली, मी टाटा केलं | विशालची उडवली खिल्ली |
महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आणणार आणि तीही स्वबळावरच
रतन टाटा भेटीचा मी शुभसंकेत समजतो
रतन टाटा मनसे वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला भेटायला आले... हा तुमचाच बहुमान
मी पक्ष स्थापन केला त्यावेळी तुम्ही आले नसतात तर...काय झालं असतं..हे उच्चारलं तरी अंगावर काटा येतो
माझ्यात हिंमत येते ती तुमच्यामुळेच
तुमच्यामुळे सर्व चाललं आहे