मला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका - राज

मी जालन्यात जाहीर केले. मात्र, पुण्यात माझी सभा नाही. तसेच पुण्यात माझा तसा काहीच कार्यक्रम नाही. पुण्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आव्हान दिल्याने मी पुण्यात जाणार असल्याचे जाहीर केलं. कोणीतरी तरी मुर्खासारखे बोलतं, त्यामुळे मी लक्ष घातलं एव्हढच, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 4, 2013, 06:09 PM IST

www.24taas.com, मुंबई
मी जालन्यात जाहीर केले. मात्र, पुण्यात माझी सभा नाही. तसेच पुण्यात माझा तसा काहीच कार्यक्रम नाही. पुण्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आव्हान दिल्याने मी पुण्यात जाणार असल्याचे जाहीर केलं. कोणीतरी तरी मुर्खासारखे बोलतं, त्यामुळे मी लक्ष घातलं एव्हढंच, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं.
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला जाहीर आव्हान दिले होते. मी आता इथे (जालना), २ तारखेला सांगतो, ७ तारखेला पुण्यात येत आहे. हिम्मत असेल तर मला रोखून दाखवाच. असे जाहीर आव्हान दिले होते. राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे यांनी, तुम्ही पुण्यात येऊन दाखवा, असे आव्हान राज ठाकरेंना दिले होते.

राज ठाकरे यांच्या ईशाऱ्यानंतर राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील शहर अध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या माध्यमातून प्रसिद्ध पत्रक काढले होते. राज यांना पुण्यात येताना अडवू नका. त्यांना पुण्यात येवू दे. शांततेने आणि संयमाने सामोरे जा, असा आदेश शरद पवार यांनी दिला होता.
शरद पवारांनी लक्ष घातल्याने पुण्यातील अंकुश काकडे यांची हवाच निघून गेली. पवारांच्या भूमिकेनंतर राज ठाकरे यांनी संयम दाखवला. मला संघर्ष करण्याची मुळीच ईच्छा नाही. मी पुण्याला सहज जाणार होतो. मी शरद पवारांवर टीका केलेली नाही. मी पवारांना प्रश्न विचारलेत. दुष्काळात आयपीएल क्रिकेटचे सामने कशासाठी?, राज ठाकरे यावेळी म्हणालेत.