भारत-बांग्लादेश मॅचमध्ये वेगळंच रेकॉर्ड

आशिया कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतानं बांग्लादेशचा 45 धावांनी पराभव केला आहे.

Updated: Feb 25, 2016, 09:57 AM IST
भारत-बांग्लादेश मॅचमध्ये वेगळंच रेकॉर्ड title=

मिरपूर: आशिया कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतानं बांग्लादेशचा 45 धावांनी पराभव केला आहे. रोहित शर्मा हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. याच मॅचमध्ये भारतीय बॉलर्सनी आगळवेगळं रेकॉर्ड केलं आहे. 

भारताकडून बॉलिंग टाकलेल्या 5 पैकी 4 बॉलरनी आपल्या 4 निर्धारित ओव्हरमध्ये 23 रन दिल्या. त्यामुळे या चारही बॉलर्सचा इकोनॉमी रेटही 5.75 एवढा होता.

 या मॅचमध्ये आशिष नेहरानं 23 रनच्या मोबदल्यात 3 विकेट, बुमराहनं 23 रन देऊन 1 विकेट, हार्दिक पंड्यानं 23 रन देऊन 1 विकेट तर आर.आश्विननंही 23 रन देऊन 1 विकेट घेतली. 

या मॅचमध्ये कॅप्टन धोनीनं रविंद्र जडेजालाही बॉलिंग दिली, पण त्यानं मात्र 4 ओव्हरमध्ये 25 रन दिल्या. आपल्या शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजानं 2 वाईड टाकले नसते तर कदाचित पाचही बॉलर्सनी तेवढ्याच रन दिल्याचा वेगळाच इतिहास घडला असता.