मैदानातून विराटचा अनुष्काला फ्लाईंग किंस

भारत आणि श्रीलंका सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा उत्साह वाढवण्यासाठी आलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

Updated: Nov 10, 2014, 11:53 AM IST
मैदानातून विराटचा अनुष्काला फ्लाईंग किंस title=

हैदराबाद : भारत आणि श्रीलंका सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा उत्साह वाढवण्यासाठी आलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

कोहलीने या सामन्यात अर्धशतक केलं, तसेच वडे सामन्यात सर्वात वेगवान ६ हजार धावा करणारा बॅटसमनही विराट ठरलाय.

कोहलीने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर आपलं हेल्मेट काढलं आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनुष्काकडे पाहिलं. अनुष्कानेही उभं राहून विराट कोहलीच्या अभिवादनाला उत्तर दिलं, अनुष्का आपला बॉयफ्रेन्ड विराटचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानात आली होती.

कोहलीने बॅटला जवळ आणून अनुष्काला फ्लाईंग किस दिला. विराटने हे तोपर्यंत केलं जोपर्यंत भारत विजयाच्या समीप आला होता, फास्टेस्ट ६ हजार धावा करण्याचं विराटचं रेकॉर्ड त्याने पूर्ण केलं होतं.

भारत आणि इंग्लंड सामन्याच्या वेळी देखिल अनुष्का तेथे उपस्थित होती, तेथे कोहलीचं प्रदर्शन खराब झालं आणि अनुष्काच्या उपस्थितीवर तेथे खूप टीका झाली, अनुष्का आणि विराटचा साखरपुडा होणार असल्याच्या बातम्या सध्या येत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.