मुंबई : बंगळुरुत झालेल्या भारतविरुध्द ऑस्ट्रेलिया कसोटीचा वाद काही संपायचा नाव घेत नाहीये. याच वादात आता ऑस्ट्रेलियन माध्यमांनी उडी घेतलीये.
माध्यमांनी म्हटलंय,'जेव्हा विराटला एलबीडब्ल्यू आऊट दिलं गेलं , तेव्हा कुंबळे ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांच्या खोलीत घुसून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागू लागला. सामन्यादरम्यान अशी भेट घेणं,नियमबाह्य आहे.
त्यात पुढे म्हटलंय की, 'तसंच ड्रेसिंग रुममध्ये परतताना विराटने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना शिवीगाळ केली. तसंच सामन्यानंतर अधिकाऱ्यांवर पाण्याच्या बॉटल्सही उडवल्या.'
या वृत्तपत्रांनी म्हटलंय की ,'कर्णधार विराट आणि कोच अनिल कुंबळे दोघांचही त्या सामन्यादरम्यानचं आणि सामन्यानंतरचं वर्तन पुर्णपणे अशोभनीय होतं.
त्यांच्या या गैरवर्तनावर कोणतीही कारवाई न करता आयसीसी कसोटी क्रिकेटमधल्या अशा बेशिस्तीला खतपाणी घालत्येय.'