भारत vs ऑस्ट्रेलिया : दुसरा टी-२० सामन्याआधी ही खास बाब

टीम इंडियाने पहिला टी-२० सामना जिंकल्याने आत्मविश्वास वाढलाय. तर शुक्रवारी टीम इंडिया दुसरा सामना खेळत आहे. तीन सामन्याच्या मालिकेत सीरीज जिंकण्याचा निर्धार टीमचा असणार आहे. या दौऱ्यात भारताने आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे. त्याआधी या सामन्याआधीच्या खास बाबी.

Updated: Jan 28, 2016, 11:12 PM IST
भारत vs ऑस्ट्रेलिया : दुसरा टी-२० सामन्याआधी ही खास बाब title=

मेलबर्न : टीम इंडियाने पहिला टी-२० सामना जिंकल्याने आत्मविश्वास वाढलाय. तर शुक्रवारी टीम इंडिया दुसरा सामना खेळत आहे. तीन सामन्याच्या मालिकेत सीरीज जिंकण्याचा निर्धार टीमचा असणार आहे. या दौऱ्यात भारताने आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे. त्याआधी या सामन्याआधीच्या खास बाबी.

युवराज आणि सुरेश रैनाला संधी

दुसऱ्या टी-२० सामन्यात युवराज आणि सुरेश रैना खेळण्याची अधिक शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात सिडनीत शेवटची वनडे जिंकून टीम इंडियाने विजयाचा स्वाद चाखलाय. त्यानंतर अॅडलेडमधील पहिला टी-२० सामना जिंकलाय. त्यामुळे टीममध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

 

कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गुरकीरत मान आणि रिषी धवन यांना संधी दिलेली नाही. मात्र, युवराज सिंग आणि सुरेश रैना हे दोघे सामन्यात खेळण्याची अधिक शक्यता आहे. तर अश्विनने पहिल्या टी-२० सामन्यात चांगले पुनरागम केलेय. तसेच जसप्रीत बुमराने आपल्या पदार्पणात सर्वांना प्रभावित केलेय.

गोलंदाजीची कोणतीही समस्या नाही

गोलंदाजीत भारताला कोणती समस्या नाही. टीम इंडियाचा बॅटींग फळी मजबूत असून क्रमही ठरला आहे. अजिंक्य रहाणे अजूनही तंदरुस्त झालेला नाही. त्यामुळे तो सामन्यात नसेल. धोनी त्याला टीममध्ये घेवून धोका पत्करणार नाही.

युवराजला पहिली संधी

सुरेश रैनाने अॅडलेड ओव्हलमैदानावर ३४ बॉल्समध्ये ४१ रन्स बनविले. विराट कोहलीने आक्रमक होत चांगले प्रदर्शन केले. भारतीय टीमला शेवटच्या १० ओव्हरमध्ये काहीही समस्या नाही. धोनी टी-२०मध्ये डावे-उजवे खेळाडूंवर भर देतो. त्यामुळे युवराजला पहिल्यांदा उतरण्याची शक्यता आहे. युवीने २० ओव्हर फिल्डींग केली शिवाय एक ओव्हर टाकली.