इंग्लंड : टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची वन डे मालिका सहज खिशात टाकल्याने शेवटचा एक दिवशी सामना जिंकण्याचा निर्धार कर्णधार महेंद्रसिंग धोनी टीमने केलाय.
पाचव्या व अखेरच्या वन-डे लढतीत विजय मिळवत इंग्लंडला ‘क्लिन स्वीप’ देण्यास उत्सुक आहे. कसोटी मालिका गमाविणाऱ्या भारतीय संघाने वन-डे सामन्यांच्या मालिकेत चांगले यश संपादन केले.
पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर विश्व चॅम्पियन भारताने सलग तीन सामने जिंकत मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.
विजयाने मालिकेचा शेवट करण्यास शास्त्री आणि धोनी इच्छूक आहेत. इंग्लंडला वन-डे सामन्यांच्या मालिकेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भारतीय गोलंदाजांनी या मालिकेत वर्चस्व गाजवले.
अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन या सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली आहे. यानंतरच्या लढतीतही रहाणे-धवन यांच्याकडून डावाची सुरुवात करण्यास उत्सुक असल्याचे संकेत कर्णधार धोनीने दिले आहे. त्यामुळे ही संधी ते कसे पार पाडतात, याकडे लक्ष लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.