हा रेकॉर्ड मोडायला 200 वर्ष पाहावी लागेल वाट!

हा क्रिकेटमध्ये 1810 साली झालेला रेकॉर्ड होता. हो याचवर्षी हे रेकॉर्ड बनवलं होतं. हा रेकॉर्ड कोणतीही टीम आपल्या नावावर करू इच्छिणार नाही. सोबतच हा रेकॉर्ड होऊन 200 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी आताही हा रेकॉर्ड मोडण्याची वाट पाहत आहे. 

Updated: Sep 4, 2014, 10:22 PM IST
हा रेकॉर्ड मोडायला 200 वर्ष पाहावी लागेल वाट! title=

मुंबई: हा क्रिकेटमध्ये 1810 साली झालेला रेकॉर्ड होता. हो याचवर्षी हे रेकॉर्ड बनवलं होतं. हा रेकॉर्ड कोणतीही टीम आपल्या नावावर करू इच्छिणार नाही. सोबतच हा रेकॉर्ड होऊन 200 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी आताही हा रेकॉर्ड मोडण्याची वाट पाहत आहे. 

वर्ल्ड क्रिकेटमध्ये लोवेस्ट स्कोअरवर आऊट होण्याचा हा रेकॉर्ड आहे आणि हा रेकॉर्ड केला होता ऑल इंग्लंड आणि 'द बीज' (या टीममध्ये अधिकाधिक बॅट्समनचं आडनाव बी या अक्षरानं सुरू झालं होतं.). ही मॅच लॉर्ड्सवर 1810 मध्ये खेळली गेली होती. 

या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या द बीज टीमनं 137 रन्स केले होते. ज्यानंतर बॅटिंग करायला आलेली ऑल इंग्लंडची टीम फक्त 100 रन्स करू शकली.  
मात्र खरी गंमत तर द बीजच्या दुसऱ्या इनिंगमध्ये घडली. बॅटिंग करणारी द बीजची टीम अवघ्या 6 रन्सवर ऑलआऊट झाली आणि त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.  

हो या बीएसच्या इनिंगमध्ये 8 बॅट्समनना आपलं खातंही उघडता आलं नाही. जेव्हा की 4 रन्स बॅट्समन जेम्स वेल्सनं बनवलेत. तर 1 रन्स जेम्स लॉकेलनं बनवले. या मॅचमध्ये 9 'बीज' बॅट्समनमध्ये फक्त एकच बॅट्समननं 1 रन केलं. 

ही मॅच अखेरीस ऑल इंग्लंडनं 4 विकेटवर 44 रन्स बनवून 6 विकेटनं जिंकली. मात्र द बीजचा हा रेकॉर्ड आजपर्यंत जिवंत आहे. आतापर्यंत कोणतीही टीम क्रिकेटच्या इतिहासात 6 रन्सपेक्षा कमी रन्सवर ऑलऑऊट झाली नाही. 

कोन आहे द बीज?

द बीजची टीम 18व्या शतकाच्या सुरुवातीची इंग्लंडच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खेळणारी एक ओकेशनल टीम होती. या टीममध्ये खेळणारे अधिकाधिक बॅट्समनची नावं 'बी'नं सुरू व्हायची. या टीमनं 1805 ते 1832पर्यंत फर्स्ट-क्लास क्रिकेट खेळलं. टीममध्ये विल्यियम बॅलडॅम, जॅम ब्रोडफ्रिज आणि फ्रॅडरिक ब्यूकलर्क सारखे महान खेळाडू होते. 

 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.