मुंबई : डाव्या मांडीच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून, गुजरात लायन्सचा धडाकेबाज फलंदाज ब्रेन्डन मॅक्युलमला माघार घ्यावी लागली आहे.
दिल्लीकडून सात विकेट्सनी झालेल्या पराभवानंतर गुजरातचे आयपीएलमधील आव्हान साखळीतच संपुष्टात आले आहे. मात्र यंदाच्या मोसमात गुजरातचे अजूनही ३ सामने शिल्लक आहेत, त्यात ब्रेन्डन मॅक्युलम खेळणार नाही.
मॅक्युलमने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे, यंदाच्या आयपीएल मोसमात कमीतकमी कालावधीत अधिकाधिक सामने खेळवण्याचा झालेला प्रयत्न आणि दर २ दिवसांआड करावा लागणार प्रवास याचा आपल्यावर ताण पडल्याचं त्याने म्हटलं आहे.