'एमसीए'कडून 'हजारी'लाल प्रणव धनावडेचा सन्मान!

क्रिकेटमध्ये पहिल वहिले हजार रन्स बनवणाऱ्या प्रणव धनावडे या तरुणाला मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कडून नुकतंच सन्मानित करण्यात आलं.

Updated: Jan 14, 2016, 11:26 AM IST
'एमसीए'कडून 'हजारी'लाल प्रणव धनावडेचा सन्मान! title=

मुंबई : क्रिकेटमध्ये पहिल वहिले हजार रन्स बनवणाऱ्या प्रणव धनावडे या तरुणाला मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कडून नुकतंच सन्मानित करण्यात आलं.

१० बॉल्समध्ये १० विकेट घेण्याचा पराक्रम करणाऱ्या माजी क्रिकेटर माधव आपटे यांच्या हस्ते प्रणवला सन्मानित करण्यात आलं. यावेळी, प्रणवला १ लाख २० हजारांचा चेक आणि ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करण्यात आला. 

 

यावेळी एमसीए अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. आपल्या शालेय दिवसांत क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी टीमला केवळ १४ रन्स देऊन १० बॉल्समध्ये १० विकेट नोंदवणारे माधव आपटे प्रणवचा सन्मान करण्यासाठी योग्य व्यक्ती आहेत, असं पवारांनी यावेळ म्हटलं. 

काही दिवसांपूर्वीच प्रणवनं नाबाद १००९ रन्स बनवून क्रिकेटच्या कोणत्याही फॉर्मेटमधील सगळ्यात जास्त स्कोअर उभारण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला होता. इंटर स्कूल क्रिकेट टूर्नामेंटमध्ये प्रणवनं ३२७ बॉल्समध्ये १२९ फोर आणि ५९ सिक्स ठोकत नाबाद १००९ रन्सचा डोंगर उभा केला होता. याबद्दल त्याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. 

एमसीएनं यासाठी प्रणवला पुढच्या पाच वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला १० हजार रुपयांची स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेतलाय.