झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना

दहा जुलैपासून सुरु होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ मुंबईहून आज पहाटे रवाना झालाय. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पहिलाच दौरा आहे.

PTI | Updated: Jul 7, 2015, 09:14 AM IST
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना title=

मुंबई : दहा जुलैपासून सुरु होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ मुंबईहून आज पहाटे रवाना झालाय. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पहिलाच दौरा आहे.

बांग्लादेश दौऱ्यावर पराभवाचा सामाना करावा लागल्यानंतर टीम इंडियामध्ये झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सुरेश रैना या सिनिअर खेळाडूना या दौऱ्यावर विश्रांती देण्यात आलीय.

कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर टाकण्यात आलीय. शिवाय वन डेच्या संघात हरभजन सिंग कमबॅक करतोय. झिम्बाव्बे दौऱ्यावर भारतीय संघ २ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.

बांग्लादेश दौरा हा इतिहास झाला आहे. मी वास्तवात राहणे पसंत करतो, त्यामुळे बांग्लादेशमध्ये मला वगळण्यात आले होते. ते मी आता विसरलो असून झिम्बाब्वे दौऱ्याचा विचार करत आहे, असे स्पष्ट मत कर्णधार अजिंक्य रहाणे यांने व्यक्त केलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.