आयपीएलच्या या मोसमातली पहिली सेंच्युरी, संजू सॅमसननं पुण्याला धुतलं

आयपीएलच्या दहाव्या मोसमातील पहिली सेंच्युरी झळकवण्याचा मान दिल्लीच्या संजू सॅमसनला मिळाला आहे. 

Updated: Apr 11, 2017, 11:22 PM IST
आयपीएलच्या या मोसमातली पहिली सेंच्युरी, संजू सॅमसननं पुण्याला धुतलं  title=

पुणे : आयपीएलच्या दहाव्या मोसमातील पहिली सेंच्युरी झळकवण्याचा मान दिल्लीच्या संजू सॅमसनला मिळाला आहे. पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये संजूनं ६३ बॉलमध्ये १०२ रन्सची खेळी केली. संजूच्या या खेळीमध्ये ८ फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता.

संजू सॅमसनचं शतक आणि क्रिस मॉरिसच्या ९ बॉलमध्ये केलेल्या ३८ रन्समुळे दिल्लीनं पुण्यापुढे २०६ रन्सचं तगडं आव्हान ठेवलं. या मॅचमध्ये पुण्याचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथ पोटाच्या दुखापतीमुळे खेळत नाहीये. स्मिथऐवजी अजिंक्य रहाणेकडे पुण्याचं नेतृत्व देण्यात आलं आहे. 

पाहा संजू सॅमसनची फटकेबाजी