बांगलादेशच्या ताइजुलने पहिल्याच मॅचमध्ये घेतली हॅट्रीक

बांग्लादेशचा ताइजुल इस्लाम याने शेरे बांग्ला स्टेडियममध्ये झिम्बाब्वे विरुद्ध सामानन्यात पाचव्या वन डे सामन्यात अशी कामगिरी केली, जी करण्याचे स्वप्न प्रत्येक गोलंदाज पाहत असतो. ताइजुलने आपल्या पहिल्याच सामन्यात हॅट्ट्रिक घेऊन वन डे क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Updated: Dec 1, 2014, 06:07 PM IST
बांगलादेशच्या ताइजुलने पहिल्याच मॅचमध्ये घेतली हॅट्रीक title=

चितगाव : बांग्लादेशचा ताइजुल इस्लाम याने शेरे बांग्ला स्टेडियममध्ये झिम्बाब्वे विरुद्ध सामानन्यात पाचव्या वन डे सामन्यात अशी कामगिरी केली, जी करण्याचे स्वप्न प्रत्येक गोलंदाज पाहत असतो. ताइजुलने आपल्या पहिल्याच सामन्यात हॅट्ट्रिक घेऊन वन डे क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

डावखुरा फिरकी गोलंदाजा असलेल्या या गोलंदाजाने ७ ओव्हरमध्ये दोन मेडन टाकून केवळ अकरा रन देत चार विकेट घेतल्या त्यामुळे झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ ३० ओव्हरमध्ये १२८ धावांवर गारद झाला.

 
हॅट्ट्रिकचा ही कामगिरी ताइजुल याने दोन ओव्हरमध्ये केली. २७ व्या ओव्हरमध्ये ताइजुलने दोन विकेट पहिल्या आणि सहाव्या चेंडूवर घेतल्या. त्यानंतर २९ व्या ओव्हरमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर त्याने दोन विकेट घेतल्या. २७ व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर सोलोमन माइरे आणि शेवटच्या चेंडूवर टिनसे पेनयांगरा आणि २९ ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर नयाम्बू आणि टेंडाई याला दुसऱ्या चेंडूवर बाद केले. या सर्व विकेटसाठी ताइजुलला कोणत्याही इतर खेळाडूची गरज नाही पडली. 

ताइजुल एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील ४५ वा आणि बांगलादेशातील चौथा खेळाडू आहे. यापूर्वी कोणताही गोलंदाज पदार्पणाला ही कामगिरी करू शकला नाही. 
२२ वर्षांचा ताइजुल आतापर्यंत ५ टेस्ट मॅचमध्ये शानदार प्रदर्शन करताना २५ विकेट घेतल्या. पाच मॅचच्या सिरीज बांग्लादेश ४-०ने पुढे आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.