आयपीएल मॅच महाराष्ट्रात होणार नाही ?

महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना आयपीएलच्या मॅच घेण्यावरुन वाद सुरु आहे.

Updated: Apr 8, 2016, 03:53 PM IST
आयपीएल मॅच महाराष्ट्रात होणार नाही ? title=

मुंबई: महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना आयपीएलच्या मॅच घेण्यावरुन वाद सुरु आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल करण्यात आली आहे. आयपीएलच्या मुंबईत होणाऱ्या पहिल्या मॅचला हायकोर्टानं परवानगी दिली असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. 

आयपीएलच्या राज्यात होणाऱ्या मॅचसाठी पिण्यायोग्य पाणी देणार नाही, असं  मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तसंच आयपीएलच्या मॅच राज्याबाहेर खेळवल्या गेल्या तरी आम्हाला काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रियाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

महाराष्ट्रात होणाऱ्या सामन्यांसाठी पिण्यायोग्य पाणी वापरणार नाही, असं आयपीएलच्या व्यवस्थापनानं सांगितलं आहे, पण याची खात्री झाल्याशिवाय आम्ही परवानगी देणार नाही, असा आक्रमक पवित्राही फडणवीसांनी घेतला आहे.