फेसबुक ७ मार्चला बदणार आपलं ‘फेस’...

आपलं फेसबुकचं पेज नेहमी अपडेट राहावं आणि ते अप टू डेट राहावं यासाठी काळजी घेणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी... सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक लवकरच आपलं ‘फेस’ बदलून आपल्या समोर येणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 3, 2013, 07:15 PM IST

www.24taas.com, मुंबई
आपलं फेसबुकचं पेज नेहमी अपडेट राहावं आणि ते अप टू डेट राहावं यासाठी काळजी घेणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी... सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक लवकरच आपलं ‘फेस’ बदलून आपल्या समोर येणार आहे. येत्या ७ मार्चपासून नव्या रुपात ही साईट पाहायला मिळेल.
येत्या सात मार्चपासून फेसबुक पेजचं न्यूज फीड नव्या रुपात लॉन्च करत असल्याचं फेकबुकच्यावतीने एका ई-मेलमार्फत जाहीर करण्यात आलंय. १०० कोटींहून अधिक युजर्स असणाऱ्या फेसबुकचा नवा लूक कॅलिफोर्नियामधील मेन्लो पार्कमध्ये एका मोठ्या पत्रकार परिषदेदरम्यान लॉन्च करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षातले एफबीचे हे दुसरे मोठे प्रॉडक्ट लाँचिंग आहे. याआधी जानेवारीत फेसबुकने सोशल सर्च फीचर बाजारात आणले होते.

फेसबुक पेजवरील सध्याच्या न्यूजफीडमध्ये युजर्सच्या मित्रांनी नुकतेच टाकलेले फोटोज, व्हिडीओ आणि प्रतिक्रियाचे अपडेट मिळत असतात. युजर्स प्रोफाईल, सर्च आणि न्यूजफीड हे फेसबुकचे तीन महत्वाचे पिलर्स असून युजर्सना आकर्षित करण्यासाठी नवा लूक लॉन्च करत असल्याची माहिती फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी दिलीय.